सुधन : विश्वासाचं धन !

व्यवसावृद्धी असो वा इतर विविध आर्थिक गरजा, त्या पूर्ण करण्यासाठी कर्ज घेणे हा आजच्या काळातला एक महत्त्वाचा पर्याय बनला असून गोल्ड लोन घेण्याला लोक पहिली पसंती दर्शवतात. त्यामागील अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे गोल्ड लोन घेताना लागणारी कमीत कमी कागदपत्रे व कमीत कमी वेळ. मात्र गोल्ड लोन घेताना गरज असते ती कर्ज देणाऱ्या संस्थेची विश्वसनीयता आणि पारदर्शकता बघण्याची. सुधन गोल्ड लोन ही संस्था ग्राहकांप्रती कायमच जपत आली आहे ही विश्वसनीयता आणि पारदर्शकता. म्हणूनच अल्पावधीत सुधन गोल्ड लोन बनलंय अगणित ग्राहकांच्या विश्वासाचं धन!

ग्राहकहिताचे धोरण जोपासत सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून सुधन आज ग्रामीण, शहरी आणि निमशहरी भागातील अगणित गरजवंतांना गोल्ड लोन सुविधा पुरवत आहे. सुधनकडे असलेले तज्ज्ञ अधिकारी, ग्राहकांप्रती आपुलकीची आणि सहकार्याची भावना जोपासणारे कर्मचारी आणि कर्ज वितरणासाठी असलेली सुसज्ज यंत्रणा यामुळे ग्राहकांचे आर्थिक प्रश्न सुधन अगदी सहजतेने सोडवत आहे आणि सामाजिक भान जपत आपली सोनेरी वाटचाल करत आहे.

  • गोल्ड लोन

    ६ ते १५% पर्यंत व्याजदर

  • कर्ज वितरण

    फक्त १४ मिनिटांत

  • सोने मूल्याच्या

    ९०% पर्यंत कर्ज

सुधन पोहोचतंय महाराष्ट्रासह ७ राज्यात..

जरी सुधनची वाटचाल नवी असली तरी आज सुधन महाराष्ट्रासह ७ राज्यात मोठ्या वेगाने पोहोचत असून गरजवंतांचे आर्थिक प्रश्न सोडवत आहे. ही गोष्ट ग्राहकांचा सुधनवरील विश्वास आणि कार्यक्षमतेची साक्ष देणारीच आहे.

ग्राहकांप्रतीची बांधिलकी आणि व्यवहारातील पारदर्शकता या विविध गोष्टींच्या बळावर सुधन हे भारतात सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून गोल्ड लोनमध्ये आर्थिक क्रांती घडवत आहे.

  • ₹ २,०००+ कोटी
    किमतीचे
    गोल्ड लोन वाटप
  • ०७
    राज्यांमध्ये
    कार्यरत
  • ६५+
    जिल्ह्यांमध्ये
    यशस्वीरित्या कार्यरत
  • ३०० +
    तालुक्यांमध्ये
    कार्यरत
  • १,८००+
    लाभार्थी
    गावे
  • २,००,०००+
    समाधानी
    ग्राहक
  • ₹ ७०० कोटी
    व्यवस्थापन
    अंतर्गत मालमत्ता

सुधनशी संलग्नित पतसंस्था

विविध पतसंस्थांच्या सक्षम साथीसह सुधनला अभिमान आहे महाराष्ट्रातील नामवंत वित्तसंस्थासोबत संलग्नित असण्याचा.

  • कोटक महिंद्रा बँक
  • समता पतसंस्था
  • गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि.
  • महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
  • महेश्वर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.
  • अर्थसिद्धी नगरी सहकारी पतसंस्था मर्यादित.
  • समृद्धी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.
  • समता मल्टिस्टेट
  • श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था
  • जयहिंद नागरी कॉ-ऑप सोसायटी लि.
  • पारिजात कॉ-ऑप क्रेडिट सोसायटी लि.
  • आदित्य-अनघा मल्टीस्टेट क्रेडिट कॉ-ऑप सोसायटी लि.
  • शिवधारा महिला नागरी सहकारी पतसंस्था लि.

लीडरशिप टीम

सुधन, वित्तपुरवठा क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांच्या टीमद्वारे चालवली जाणारी नावीन्यपूर्ण संस्था

  • सौ. स्वाती
    कोयटे
    अध्यक्ष
  • श्री. संदीप
    कोयटे
    संचालक
  • श्री. स्वप्नील
    घन
    संचालक
  • श्री. सौरभ
    घन
    संचालक

ग्राहक म्हणतात

अल्पावधीत सुधनने ग्राहकांचा विश्वास जिंकला आणि गोल्ड लोनद्वारे ग्राहकांच्या आर्थिक समस्या सोडवून ग्राहकांना दिला आत्मविश्वास
आणि सकारात्मक अनुभव. बदल घडवणारा... प्रगतीचा मार्ग दाखवणारा !

नारायण डोंगरदिवे

खूप दिवसांपासून कुक्कुटपालनाचा जोड व्यवसाय करण्याचा माझा विचार होता. पण त्यासाठी लागणारं भांडवल काही केल्या जमा होत नव्हतं. मित्राने मला सुधन गोल्ड लोनबद्दल सांगितलं. मी सुधनशी जोडलेल्या नजीकच्या पतसंस्थेत गेलो. अतिशय कमी व्याजदराने अन् सोने किमतीच्या ९० टक्के कर्ज मला मिळालं. त्यामुळं भांडवलाचा प्रश्न पूर्णपणे सुटला. आज माझा कुक्कुटपालनाचा व्यवसाय एकदम जोरात सुरू आहे. सोनं आणि सुधनची साथ यामुळे स्वप्न साकार झालं.

माधुरी माने

माझं शिवणकाम आवडत असल्याने अनेक बायकांनी हा शिवणकामाचा व्यवसाय वाढवण्याचा सल्ला दिला. पण त्यासाठी पाहिजे तेवढी रक्कम जवळ नव्हती. अशावेळी सुधन गोल्ड लोनबद्दल कळालं. सुरूवातीला सोनं ठेवून कर्ज घ्यावं की नको या गोंधळात मी होते. पण सुधन गोल्ड लोनबद्दल नीट जाणून घेतल्यावर कळलं की व्याजदर खूप कमी आहे. आणि सुधनमध्ये शेवटपर्यंत आपलं सोनं अगदी सुरक्षित राहतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसं विश्वासाची आणि सहकार्य करणारी आहेत. त्यामुळे बिनधास्त गोल्ड लोन घेतलं. आणि काही महिन्यातच सोडवलंही. आता गावात माझा शिवणकामाचा मोठा व्यवसाय आहे.

भगवंतराव जाधव

(शेतकरी- शेळीपालन व्यावसायिक)

माझी दोन एकर शेती आहे. शेतीबरोबर शेळीपालनाचा विचार खूप वर्षांपासून मनात होता. पण शेतीतून पुरेसं उत्पन्न होत नसल्यामुळे तो विचार मार्गी लागत नव्हता. अशातच सुधन गोल्ड घेऊन भरभराट केलेले काही विश्वासातले व्यावसायिक लोक भेटले. त्यांचं मार्गदर्शन मिळालं. मग काय, घरात कामापुरतं सोनं होतंच. सरळ सुधन गोल्ड लोन देणारी पतसंस्था गाठली. चट अर्ज केला अन् पट कर्ज मिळालं. आणि शेळीपालन व्यवसायाचं माझं कित्येक वर्षाचं स्वप्न साकार झालं !

सोपे, पारदर्शक, सुरक्षित

तात्काळ गोल्ड लोन मिळवा

आमच्याबद्दल

सुधन, २०२१ मध्ये स्थापन झालेली व सहकारी पतसंस्थ्यांच्या माध्यमातून वित्तपुरवठा करणारी एक नावीन्यपूर्ण कंपनी. जी विशेषत: ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोकांना तात्काळ गोल्ड लोन सेवा पुरवते. आणि कमीत कमी व्याजदरात गोल्ड लोन देऊन लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपली मोलाची भूमिका बजावते.

संपर्क