ग्राहक म्हणतात

खूप दिवसांपासून कुक्कुटपालनाचा जोड व्यवसाय करण्याचा माझा विचार होता. पण त्यासाठी लागणारं भांडवल काही केल्या जमा होत नव्हतं. मित्राने मला सुधन गोल्ड लोनबद्दल सांगितलं. मी सुधनशी जोडलेल्या नजीकच्या पतसंस्थेत गेलो. अतिशय कमी व्याजदराने अन् सोने किमतीच्या ९० टक्के कर्ज मला मिळालं. त्यामुळं भांडवलाचा प्रश्न पूर्णपणे सुटला. आज माझा कुक्कुटपालनाचा व्यवसाय एकदम जोरात सुरू आहे. सोनं आणि सुधनची साथ यामुळे स्वप्न साकार झालं.

- नारायण डोंगरदिवे

माझं शिवणकाम आवडत असल्याने अनेक बायकांनी हा शिवणकामाचा व्यवसाय वाढवण्याचा सल्ला दिला. पण त्यासाठी पाहिजे तेवढी रक्कम जवळ नव्हती. अशावेळी सुधन गोल्ड लोनबद्दल कळालं. सुरूवातीला सोनं ठेवून कर्ज घ्यावं की नको या गोंधळात मी होते. पण सुधन गोल्ड लोनबद्दल नीट जाणून घेतल्यावर कळलं की व्याजदर खूप कमी आहे. आणि सुधनमध्ये शेवटपर्यंत आपलं सोनं अगदी सुरक्षित राहतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसं विश्वासाची आणि सहकार्य करणारी आहेत. त्यामुळे बिनधास्त गोल्ड लोन घेतलं. आणि काही महिन्यातच सोडवलंही. आता गावात माझा शिवणकामाचा मोठा व्यवसाय आहे.

- माधुरी माने

माझी दोन एकर शेती आहे. शेतीबरोबर शेळीपालनाचा विचार खूप वर्षांपासून मनात होता. पण शेतीतून पुरेसं उत्पन्न होत नसल्यामुळे तो विचार मार्गी लागत नव्हता. अशातच सुधन गोल्ड घेऊन भरभराट केलेले काही विश्वासातले व्यावसायिक लोक भेटले. त्यांचं मार्गदर्शन मिळालं. मग काय, घरात कामापुरतं सोनं होतंच. सरळ सुधन गोल्ड लोन देणारी पतसंस्था गाठली. चट अर्ज केला अन् पट कर्ज मिळालं. आणि शेळीपालन व्यवसायाचं माझं कित्येक वर्षाचं स्वप्न साकार झालं !

- भगवंतराव जाधव - (शेतकरी- शेळीपालन व्यावसायिक)

आमच्याबद्दल

सुधन, २०२१ मध्ये स्थापन झालेली व सहकारी पतसंस्थ्यांच्या माध्यमातून वित्तपुरवठा करणारी एक नावीन्यपूर्ण कंपनी. जी विशेषत: ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोकांना तात्काळ गोल्ड लोन सेवा पुरवते. आणि कमीत कमी व्याजदरात गोल्ड लोन देऊन लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपली मोलाची भूमिका बजावते.

संपर्क