चटकन अर्ज,
पटकन कर्ज

सुधन जाणते तुमच्या सोन्याचे मूल्य आणि प्रतिष्ठेचे महत्त्व. सुधन कायम तत्पर आहे तुम्हाला गोल्ड लोन सेवा पुरवण्यासाठी, तुमच्या स्वप्नांना आर्थिक बळ देण्यासाठी !

आताच गोल्ड लोन मिळवा


Please Enter Your Name

Please Enter Your Contact No.

Please Enter Your Email

Please Enter City

Please Enter Pincode

सुधन : तुमच्या सोन्यावर देते जास्तीत जास्त धन

आजच्या काळात व्यवसावृद्धी असो वा इतर विविध आर्थिक गरजा, त्या पूर्ण करण्यासाठी कर्ज घेणे हा एक महत्त्वाचा पर्याय बनला आहे. पैकी गोल्ड लोन घेण्याला लोक अधिक पसंती दर्शवतात. त्यामागील अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे गोल्ड लोन घेताना लागणारी कमीत कमी कागदपत्रे. मात्र गोल्ड लोन घेताना गरज असते ती कर्ज देणार्‍या संस्थेची विश्वसनीयता आणि पारदर्शकता बघण्याची. सुधन गोल्ड लोन ही संस्था ग्राहकांप्रती कायमच जपत आलीय ग्राहकांची ही विश्वसनीयता आणि पारदर्शकता. म्हणूनच अल्पावधीत सुधन बनलंय अगणित ग्राहकांच्या विश्वासाचं धन... जे देतं तुमच्या सोन्यावर जास्तीत जास्त धन !

ग्राहकहिताचे धोरण जोपासत सुधन आज ग्रामीण, शहरी आणि निमशहरी भागातील अगणित गरजवंतांना गोल्ड लोन सुविधा पुरवत आहे. आणि ग्राहकांचे आर्थिक प्रश्न सचोटीने सोडवत आहे.

गोल्ड लोन

६ ते १६% पर्यंत व्याजदर

कर्ज वितरण

फक्त १४ मिनिटांत

सोने मूल्याच्या

९०% पर्यंत कर्ज

कमीत कमी

कागदपत्रे

सुधन गोल्ड लोन मिळवा ३ सोप्या स्टेप्सद्वारे

स्टेप १

तुमची विनंती नोंदवा

सुधनशी जोडलेल्या कुठल्याही पतसंस्थेत जा किंवा ९८२३८०७२७२ या क्रमांकावर कॉल करून आपली कर्ज विनंती नोंदवा

स्टेप २

कागदपत्रे जमा करा

सोबत आधार कार्ड व पासपोर्ट साईज फोटोग्राफ घेऊन या.


स्टेप ३

तुमची कर्ज रक्कम मिळवा

कागदपत्रे जमा केल्यावर फक्त १४ मिनिटांत कर्ज मंजुरी मिळेल. आणि आपली कर्ज रक्कम आपल्या खात्यात जमा होईल किंवा आपण ती रोख मिळवू शकता.

सुधनकडून गोल्ड लोन का घ्यावे?

आर्थिक समस्या केव्हाही आणि कुणालाही निर्माण होऊ शकते. बर्‍याच वेळा आपली प्रतिष्ठा जपत वेळेवर कर्जदाता उपलब्ध होणे आणि सहजगत्या आवश्यक ती रक्कम मिळणे ही एक कठीण बाब असते. पण तुम्ही जेव्हा सुधन गोल्ड लोनची निवड करता तेव्हा ही चिंता राहत नाही.

सुधनमध्ये तुम्ही तुमच्या सोने मूल्याच्या ९० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळवू शकता आणि तेही फक्त १४ मिनिटांत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमीत कमी व्याजदर आणि कमीत कमी कागदपत्रांत.

सुधन पोहोचतंय महाराष्ट्रासह ७ राज्यात...

सुधनची वाटचाल जरी नवीन असली तरी आज सुधन देशाच्या ७ राज्यात मोठ्या वेगाने पोहोचत आहे. गरजवंतांचे आर्थिक प्रश्न सोडवत आहे. ही गोष्ट ग्राहकांचा सुधनवरील विश्वास आणि सुधनच्या कार्यक्षमतेची साक्ष देणारीच आहे. ग्राहकांप्रतीची बांधिलकी आणि व्यवहारातील पारदर्शकता अशा विविध गोष्टींच्या बळावर सुधन हे लवकरच ग्रामीण महाराष्ट्राचा आर्थिक कणा बनेल, यात शंका नाही.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्डची एक कॉपी
  • अर्जदाराचा पासपोर्ट साईजचा एक फोटो

निकष

  • किमान १ ग्रॅम सोने आवश्यक

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

गोल्ड लोन घेताना ग्राहकांच्या मनात अनेक प्रश्न, शंका असतात. पैकी नेहमीचे काही प्रश्न आणि त्याची उत्तरे इथे दिली आहेत.
जी वाचताना तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील.

गोल्ड लोन म्हणजे काय?

गोल्ड लोन हा एक सुरक्षित कर्ज प्रकार आहे. जिथे तुम्ही तुमचे सोने गहाण ठेवून कर्ज घेऊ शकता. हे कर्ज वैयक्तिक किंवा व्यावसायिक गरजांसाठी लवकरात लवकर पैसे मिळवण्याचा सोपा मार्ग आहे.

किमान किंवा कमाल कर्ज रक्कम किती आहे?

कर्जाची रक्कम तुम्ही गहाण ठेवलेल्या सोन्याच्या मूल्यानुसार/किमतीनुसार ठरते. तुम्ही कमी रक्कम ते मोठ्या रकमेपर्यंत कर्ज घेऊ शकता, जी मार्केटच्या रेटनुसार तुमच्या सोन्याच्या एका टक्केवारीपर्यंत असते. आमचे ॲप तुमच्या सोन्याच्या वजनानुसार आणि शुद्धतेनुसार किती कर्ज देता येईल हे सांगते.

कर्जाची रक्कम कशी ठरते?

कर्जाची रक्कम सोन्याच्या मार्केट रेटवर आधारित असते, ज्यामध्ये त्याचे वजन आणि शुद्धतेचा समावेश असतो. आमचे पार्टनर (बँका/संस्था) तुमच्या सोन्याचे मूल्यांकन करून कर्जाची रक्कम निश्चित करतात.

कर्ज घेतलेलं असताना, माझे सोने सुरक्षित राहील का?

होय, तुमचे सोने संपूर्ण कर्ज कालावधीत तिजोरीत किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवले जाईल. तुम्हाला तुमच्या सोन्याच्या सुरक्षिततेचा पुरावा म्हणून पावती किंवा प्रमाणपत्र दिले जाईल.

कोणतेही छुपे शुल्क आहेत का?

आम्ही संपूर्णतः पारदर्शक व्यवहार करतो. कर्जाचा अर्ज (loan application) भरताना तुम्हाला सर्व प्रक्रिया शुल्क, व्याजदर आणि दंड याबाबत स्पष्ट माहिती दिली जाईल.

माझी वैयक्तिक माहिती सुरक्षित आहे का?

होय, आम्ही डेटा गोपनीयता आणि सुरक्षेला प्राधान्य देतो. तुमच्या कर्जाच्या अर्जाबरोबरच (loan application) सर्व वैयक्तिक माहिती एन्क्रिप्टेड स्वरूपात सुरक्षितपणे साठवली जाते आणि डेटा संरक्षण कायद्यांचे पालन केले जाते.

मी माझे गोल्ड लोन रिन्यू किंवा मुदतवाढ करू शकतो का?

होय, अनेक कर्ज देणाऱ्या संस्था तुम्हाला व्याज आणि मूळ रक्कमेचा काही भाग किंवा पूर्ण भरून कर्जाची मुदतवाढ देतात. तुम्ही अॅपद्वारे मुदतवाढ विनंती करू शकता आणि त्यासंबंधीचे शुल्क पाहू शकता.

मला कर्जासंबंधी काही समस्या असल्यास काय करावे?

तुम्ही आमच्या कस्टमर सपोर्ट टीमशी थेट कॉल किंवा ईमेलद्वारे संपर्क साधू शकता. आम्ही 24/7 तुमच्या कर्जासंबंधीच्या अडचणीत तुम्हाला मदत करू.

मी इतर राज्यात स्थायिक असल्यास तिथून कर्ज घेऊ शकतो का?

होय, तुम्ही देशातील कोणत्याही ठिकाणाहून गोल्ड लोनसाठी अर्ज करू शकता. आम्ही बहु-राज्य पतसंस्था आणि बँकांसोबत काम करतो. त्याचप्रमाणे, काही कर्जदात्यांचे (बँक किंवा पतसंस्थेचे) विशिष्ट प्रादेशिक नियम असू शकतात, त्यामुळे ॲपद्वारे आपल्या भागातील उपलब्ध पर्याय तपासा.

सुधन गोल्ड लोन इतर संस्थांपेक्षा वेगळे कसे आहे?

सुधन केवळ 6% व्याजदरापासून सुरू होणारे आकर्षक व्याजदर देते, जे मार्केटमधील सर्वात कमी दरांपैकी एक आहे. तसेच, सुधन सोन्याच्या मार्केट रेटप्रमाणे 90% पर्यंत कर्ज देते, जे इतर अनेक संस्थांपेक्षा जास्त आहे. तसेच ‘14 मिनिटांत कर्ज देणे’ हे सुधनचे वैशिष्ट्य आहे.

मी सुधन गोल्ड लोन कसे परत करू शकतो?

सुधनमध्ये तुम्हाला रिपेमेंटचे अनेक पर्याय मिळतील, जसे की:

  • ऑनलाइन ट्रान्सफर (RTGS/IMPS)
  • चेक पेमेंट
  • रोख रक्कम जमा करणे
सुधन गोल्ड लोन केवळ वैयक्तिक कामांसाठी आहे की व्यवसायांसाठीही उपलब्ध आहे?

सुधन वैयक्तिक कामांसाठी आणि व्यवसाय दोन्हीसाठी गोल्ड लोन देते. व्यवसाय मालकांना त्यांच्या भांडवलासाठी सोने गहाण ठेवून झटपट रक्कम मिळू शकते.

सुधनकडून गोल्ड लोन घेण्याची प्रक्रिया काय आहे?

सुधन गोल्ड लोन मिळवण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि लवकर कर्ज देणारी आहे:

  • आधार कार्ड आणि फोटो द्या.
  • सोन्याचे मूल्यांकन सुधन एक्स्पर्टद्वारे केले जाईल.
  • मूल्यांकनानुसार, तुम्हाला सोन्याच्या मार्केट रेटनुसार 90% पर्यंत कर्ज मिळेल.
  • 1.99 लाखांपर्यंत रोख रक्कम आणि उर्वरित रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल.
  • निर्धारित कालावधीत कर्जाची परतफेड करा आणि तुमचे सोने परत मिळवा.
मी वेळेवर कर्ज फेडू शकलो नाही तर काय होईल?

जर तुम्ही वेळेवर कर्ज परत करू शकला नाही, तर कर्जदाते दंड आकारू शकतात आणि व्याज वाढत राहील. काही कालावधीनंतर, कर्ज वसूल करण्यासाठी कर्जदाता तुमच्या सोन्याचा लिलाव करू शकतो. कोणताही लिलाव करण्यापूर्वी तुम्हाला पूर्वसूचना दिली जाईल.

मी माझे कर्ज मुदतीपूर्वी फेडू शकतो का?

होय, तुम्ही कर्ज मुदतीपूर्वी फेडू शकता. सुधन कोणतेही प्री-पेमेंट शुल्क आकारत नाही, त्यामुळे तुम्ही कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय कर्ज फेडू करू शकता.

माझ्या कर्जासाठी कोणते व्याजदर पर्याय आहेत?

सुधन फ्लेक्सिबल व्याजदर देते, जे कर्जाची रक्कम, कालावधी आणि सोन्याच्या मूल्यावर अवलंबून असते. तुम्ही मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक व्याज भरण्याचा पर्याय निवडू शकता.

मी एकाच वेळी एकाहून जास्त गोल्ड लोन घेऊ शकतो का?

होय, तुमच्याकडे पुरेसे सोने असल्यास आणि तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असल्यास, तुम्ही अनेक गोल्ड लोन घेऊ शकता. प्रत्येक कर्ज वेगवेगळ्या मूल्यांकनावर आधारित असते.

सुधनकडे घरपोच गोल्ड लोन सुविधा आहे का?

सध्या, सुधन शाखा-आधारित गोल्ड लोन सेवा देते. मात्र, आम्ही लवकरच घरपोच गोल्ड लोन सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत, जिथे अधिकृत एजंट तुमच्या घरी येऊन सोन्याचे मूल्यांकन व कर्ज प्रक्रिया पूर्ण करतील.

ग्राहक म्हणतात

अल्पावधीत सुधनने ग्राहकांचा विश्वास जिंकला आणि गोल्ड लोनद्वारे ग्राहकांच्या आर्थिक समस्या सोडवून ग्राहकांना दिला आत्मविश्वास
आणि सकारात्मक अनुभव. बदल घडवणारा... प्रगतीचा मार्ग दाखवणारा !

नारायण डोंगरदिवे

खूप दिवसांपासून कुक्कुटपालनाचा जोड व्यवसाय करण्याचा माझा विचार होता. पण त्यासाठी लागणारं भांडवल काही केल्या जमा होत नव्हतं. मित्राने मला सुधन गोल्ड लोनबद्दल सांगितलं. मी सुधनशी जोडलेल्या नजीकच्या पतसंस्थेत गेलो. अतिशय कमी व्याजदराने अन् सोने किमतीच्या ९० टक्के कर्ज मला मिळालं. त्यामुळं भांडवलाचा प्रश्न पूर्णपणे सुटला. आज माझा कुक्कुटपालनाचा व्यवसाय एकदम जोरात सुरू आहे. सोनं आणि सुधनची साथ यामुळे स्वप्न साकार झालं.

माधुरी माने

माझं शिवणकाम आवडत असल्याने अनेक बायकांनी हा शिवणकामाचा व्यवसाय वाढवण्याचा सल्ला दिला. पण त्यासाठी पाहिजे तेवढी रक्कम जवळ नव्हती. अशावेळी सुधन गोल्ड लोनबद्दल कळालं. सुरूवातीला सोनं ठेवून कर्ज घ्यावं की नको या गोंधळात मी होते. पण सुधन गोल्ड लोनबद्दल नीट जाणून घेतल्यावर कळलं की व्याजदर खूप कमी आहे. आणि सुधनमध्ये शेवटपर्यंत आपलं सोनं अगदी सुरक्षित राहतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसं विश्वासाची आणि सहकार्य करणारी आहेत. त्यामुळे बिनधास्त गोल्ड लोन घेतलं. आणि काही महिन्यातच सोडवलंही. आता गावात माझा शिवणकामाचा मोठा व्यवसाय आहे.

भगवंतराव जाधव

(शेतकरी- शेळीपालन व्यावसायिक)

माझी दोन एकर शेती आहे. शेतीबरोबर शेळीपालनाचा विचार खूप वर्षांपासून मनात होता. पण शेतीतून पुरेसं उत्पन्न होत नसल्यामुळे तो विचार मार्गी लागत नव्हता. अशातच सुधन गोल्ड घेऊन भरभराट केलेले काही विश्वासातले व्यावसायिक लोक भेटले. त्यांचं मार्गदर्शन मिळालं. मग काय, घरात कामापुरतं सोनं होतंच. सरळ सुधन गोल्ड लोन देणारी पतसंस्था गाठली. चट अर्ज केला अन् पट कर्ज मिळालं. आणि शेळीपालन व्यवसायाचं माझं कित्येक वर्षाचं स्वप्न साकार झालं !

सोपे, पारदर्शक, सुरक्षित

तात्काळ गोल्ड लोन मिळवा

आमच्याबद्दल

सुधन, २०२१ मध्ये स्थापन झालेली व सहकारी पतसंस्थ्यांच्या माध्यमातून वित्तपुरवठा करणारी एक नावीन्यपूर्ण कंपनी. जी विशेषत: ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोकांना तात्काळ गोल्ड लोन सेवा पुरवते. आणि कमीत कमी व्याजदरात गोल्ड लोन देऊन लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपली मोलाची भूमिका बजावते.

संपर्क