नेहमी विचारले जाणारे प्रश्न

गोल्ड लोन घेताना ग्राहकांच्या मनात अनेक प्रश्न, शंका असतात. त्यापैकी नेहमीचे काही प्रश्न आणि त्याची उत्तरे इथे दिली आहेत.
जी वाचताना तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील.

सुधनच्या गोल्ड लोनसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

सुधन गोल्ड लोन घेताना फक्त आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटोची आवश्यकता आहे.

सुधनमध्ये माझं सोनं सुरक्षित राहील का?

100%. कारण तुमचं सोनं सुरक्षित राहावं यासाठी आवश्यक ती सुरक्षित यंत्रणा आणि अत्याधुनिक सुविधा सुधनकडे आहे. त्यामुळे काळजीचे कुठलेही कारण नाही.

सुधनमध्ये व्याजाचे दर कसे आहेत?

सुधनमध्ये कमीत कमी 6% व्याजदराने गोल्ड लोन दिले जाते. आणि हा व्याजदर अतिशय माफक आहे.

सुधनमध्ये कर्जमंजुरीसाठी किती कालावधी लागतो ?

आपण आवश्यक कागदपत्रे सबमिट केल्यानंतर फक्त १४ मिनिटांमध्ये आपले कर्ज मंजूर होते.

सुधनकडून घेतलेल्या गोल्ड लोनमुळे CIBIL रेटिंगवर परिणाम होतो का ?

नाही. सुधनचे गोल्ड लोन हे विविध नामवंत पतसंस्थांद्वारे मंजूर केले जाते. जे RBI च्या कक्षेत येत नाही. त्यामुळे तुमच्या CIBIL रेटिंगवर कोणताही विपरित परिणाम होत नाही.

सुधनद्वारे सोने किमतीच्या किती टक्के कर्ज दिले जाते?

सुधनमध्ये आपण तारण ठेवलेल्या सोने किमतीच्या ९०% पर्यंत कर्ज देण्यात येते.

सुधनमध्ये सोने मूल्यांकनाची फी किती आहे ?

सोने मूल्याच्या फक्त ०.२५ टक्के.

'सुधन गोल्ड लोन' घेताना रोख स्वरूपात किती रक्कम मिळते?

रू. 1,99,000 पर्यंत रोख रक्कम हातात सोपवली जाते. तर उर्वरीत रक्कम खात्यात जमा करण्यात येते.

गोल्ड लोन घेताना बचत खाते असणे आवश्यक आहे का?

हो, पण आपण खातेदार नसाल तर फक्त ५ मिनिटांमध्ये आपले खाते उघडून देण्यात येते. आणि १४ मिनिटांत आपल्या खात्यात कर्ज रक्कम जमा होते.

कर्जाची मुदतपूर्व परतफेड केल्यास किती शुल्क लागते?

सुधनद्वारे कर्जाच्या मुदतपूर्व परतफेडीसाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही.

दंडव्याज किती किती आकारले जाते?

कर्जाची मुदत संपल्यावर २% वार्षिक दंडव्याज आकारले जाते.

आमच्याबद्दल

सुधन, २०२१ मध्ये स्थापन झालेली व सहकारी पतसंस्थ्यांच्या माध्यमातून वित्तपुरवठा करणारी एक नावीन्यपूर्ण कंपनी. जी विशेषत: ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोकांना तात्काळ गोल्ड लोन सेवा पुरवते. आणि कमीत कमी व्याजदरात गोल्ड लोन देऊन लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपली मोलाची भूमिका बजावते.

संपर्क