सुधनबद्दल

सुधन : विश्वासाचं धन !

व्यवसावृद्धी असो वा इतर विविध आर्थिक गरजा, त्या पूर्ण करण्यासाठी कर्ज घेणे हा आजच्या काळातला एक महत्त्वाचा पर्याय बनला आहे. यापैकी गोल्ड लोन घेण्याला लोक अधिक पसंती दर्शवतात. त्यामागील अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे गोल्ड लोन घेताना लागणारी कमीत कमी कागदपत्रे. मात्र गोल्ड लोन घेताना गरज असते ती कर्ज देणार्‍या संस्थेची विश्वसनीयता आणि पारदर्शकता बघण्याची. सुधन गोल्ड लोन ही संस्था ग्राहकांप्रती कायमच जपत आलीय ग्राहकांची ही विश्वसनीयता आणि पारदर्शकता. म्हणूनच अल्पावधीत सुधन गोल्ड लोन बनलंय अगणित ग्राहकांच्या विश्वासाचं धन!

ग्राहकहिताचे धोरण जोपासत सुधन आज ग्रामीण, शहरी आणि निमशहरी भागातील अगणित गरजवंतांना गोल्ड लोन सुविधा पुरवत आहे. सुधनकडे असलेले तज्ज्ञ अधिकारी, ग्राहकांप्रती आपुलकीची आणि सहकार्याची भावना जोपासणारे कर्मचारी आणि कर्ज वितरणासाठी असलेली सुसज्ज यंत्रणा यामुळे ग्राहकांचे आर्थिक प्रश्न सुधन अगदी सहजतेने सोडवत आहे आणि सामाजिक भान जपत आपली सोनेरी वाटचाल करत आहे.

बहुआयामी नेतृत्व - श्री. संदीप कोयटे

गरजवंतांच्या आर्थिक समस्या सोडवण्यात हातभार लावणं आणि एक प्रकारे देशालाच आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं ह्या आपल्या ध्येयाच्या दिशेने सुधन यशस्वी घोडदौड करत आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे सुधनला लाभलेलं दूरदृष्टीचं नेतृत्व. अर्थात सुधन गोल्ड लोनचे संथ्यापक संचालक श्री. संदीप कोयटे.

श्री संदीप कोयटे म्हणजे विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले एक बहुआयामी उद्योजक. ते बांधकाम क्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवत आहेत. ज्यात शिर्डी येथील १३६ एकरांमध्ये वसलेल्या साई निवारा या महत्त्वाकांक्षी टाऊनशीपचाही समावेश आहे. तसेच कोकमठान, शिर्डी येथे २५ एकरांमध्ये वसलेल्या समता इंटरनॅशनल स्कूलद्वारे शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात पोहोचवण्याचे कार्य ते मोठ्या सचोटीने करतायेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे आणि सर्वार्थाने ते सक्षम व्हावेत हा शुद्ध हेतू यामागे आहे. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये आपले नेतृत्व आणि कर्तृत्व सिद्ध करत श्री. कोयटे यशस्वी प्रवास करत आहेत.

ग्रामीण भागातील एमएसएमई क्षेत्राला सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील वित्तपुरवठा वाढवण्यासाठी, २०१२ साली श्री. संदीप कोयटे समता नगर सहकारी पतसंस्थेत संचालक म्हणून रूजू झाले. सुरू असलेल्या योजनांसह त्यांनी प्रोडक्ट पोर्टफोलिओचेही नेतृत्व केले. श्री. संदीप कोयटे यांनी अवघ्या १८ महिन्यांच्या कालावधीत समताचा गोल्ड लोन पोर्टफोलिओ २०० कोटीहून अधिकचा केला.

सुधनमध्ये कमीत कमी व्याजदरात जास्तीत जास्त गोल्ड लोन देऊन समाजहिताचाच एक नावीन्यपूर्ण उपक्रम ते राबवत आहेत, असे म्हणायला हवे. छोट्या-मोठ्या हजारो कर्जदारांना सावकार, एनबीएससी आणि इतर जास्तीचे व्याज आकारणार्‍यांपासून वाचवणे हा यामागे उद्देश आहे.

श्री. संदीप कोयटे यांची इतर पदे

  • संचालक

    समता नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड, कोपरगाव

  • सचिव

    समता चॅरिटेबल ट्र्स्ट संचालित समता इंटरनॅशल स्कूल

  • संचालक व सहसंस्थापक

    इक्विफिनटेक प्रा. लि.

दृष्टिकोन

नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या आधारे तात्काळ वित्तपुरवठा उपलब्ध करून देणारी भारतातील अग्रगण्य संस्था बनणे.

ध्येय

सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून भारतातील सोने तारण क्षेत्रात क्रांती घडवून छोट्यात छोट्या गरजवंतापर्यंत पोहोचणे आणि आर्थिक गरजा सोडवण्यास मदतगार ठरणे.

मूल्ये

निर्णायक व
निश्चित भूमिका

आपल्या वाट्याला आलेलं प्रत्येक काम सचोटीने, मेहनतीने आणि निष्ठेने पार पाडणे.

ग्राहक
सर्वतोपरी

ग्राहकहिताला प्राधान्य देणे. त्यांना तत्पर सेवा पुरवून विश्वास संपादन करणे. ग्राहकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे.

बदलातून
प्रगतीकडे

बदलातून समाजाची आर्थिक प्रगती साधणे आणि त्याद्वारे समाजाला स्वातंत्र्याच्या मार्गावर येण्यासाठी मार्गदर्शन करणे.

सामाजिक
सशक्तीकरण

समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना आर्थिक समस्या सोडवण्यासाठी सहाय्य करणे आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करून पर्यायाने समाजाचे जीवनमान उंचावणे.

लीडरशीप टीम

सुधन, वित्तपुरवठा क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांची टीम असलेली नावीन्यपूर्ण संस्था

  • सौ. स्वाती
    कोयटे
    अध्यक्ष
  • श्री. संदीप
    कोयटे
    संचालक
  • श्री. स्वप्नील
    घन
    संचालक
  • श्री. सौरभ
    घन
    संचालक

पीआर कव्हरेज

Lorem Ipsum is simply dummy text

It is a long established fact that a reader will be distracted by the readable content of a page when looking at its layout. The point of using Lorem Ipsum is that it has a more-or-less normal distribution of letters

Lorem Ipsum is simply dummy text

It is a long established fact that a reader will be distracted by the readable content of a page when looking at its layout. The point of using Lorem Ipsum is that it has a more-or-less normal distribution of letters

Lorem Ipsum is simply dummy text

It is a long established fact that a reader will be distracted by the readable content of a page when looking at its layout. The point of using Lorem Ipsum is that it has a more-or-less normal distribution of letters

सोपे, पारदर्शक, सुरक्षित

तात्काळ गोल्ड लोन मिळवा

आमच्याबद्दल

सुधन, २०२१ मध्ये स्थापन झालेली व सहकारी पतसंस्थ्यांच्या माध्यमातून वित्तपुरवठा करणारी एक नावीन्यपूर्ण कंपनी. जी विशेषत: ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोकांना तात्काळ गोल्ड लोन सेवा पुरवते. आणि कमीत कमी व्याजदरात गोल्ड लोन देऊन लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपली मोलाची भूमिका बजावते.

संपर्क